🙏 पुणे जिल्हा रहिवासी संघ, नवी मुंबई — च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! "एकीची बळ" 🙏 पुणे जिल्हा रहिवासी संघ, नवी मुंबई — च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! "एकीची बळ"
✦ नियम व अटी

अटी व शर्ती

पुणे जिल्हा रहिवासी संघ, नवी मुंबई या संकेतस्थळाचा व संघाच्या सदस्यत्वाचा वापर करण्यापूर्वी कृपया खालील अटी काळजीपूर्वक वाचा.

१. संघाचे स्वरूप

पुणे जिल्हा रहिवासी संघ, नवी मुंबई हे केवळ एक सामाजिक, सांस्कृतिक व सेवाभावी व्यासपीठ आहे. पुणे जिल्ह्यातून नवी मुंबईत स्थायिक झालेल्या कुटुंबांना एकत्र आणणे, त्यांच्यात एकोपा वाढवणे आणि सामाजिक/शैक्षणिक/आरोग्यविषयक उपक्रम राबवणे हाच संघाचा एकमेव उद्देश आहे.

२. राजकीय तटस्थता

हे व्यासपीठ पूर्णतः अराजकीय (non-political) आहे. संघाच्या संकेतस्थळावर, सभासद निर्देशिकेत, कार्यक्रमांमध्ये किंवा कोणत्याही अधिकृत माध्यमातून कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार किंवा राजकीय विचारसरणीचा प्रचार-प्रसार करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळल्यास संबंधित सदस्य/सभासदावर कारवाई केली जाईल.

३. सदस्यत्व व पात्रता

  • नोंदणी करताना दिलेली सर्व माहिती (नाव, मोबाईल, मूळ गाव, पत्ता इ.) खरी व अचूक असणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक अर्ज संघाच्या पडताळणीनंतरच मंजूर केला जातो; मंजुरी संघाच्या विवेकाधीन आहे.
  • एका व्यक्तीचे एकच सदस्यत्व/सभासदत्व वैध राहील (एकाच मोबाईल क्रमांकावर एकच नोंदणी).

४. सदस्यता रद्द करण्याचा अधिकार

संघाला कोणत्याही सदस्य किंवा सभासदाची सदस्यता — पूर्वसूचना देऊन अथवा न देता — निलंबित किंवा रद्द करण्याचा पूर्ण अधिकार राहील, विशेषतः खालील प्रसंगी:

  • खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास
  • राजकीय मतप्रचार, धार्मिक तेढ किंवा सामाजिक तणाव निर्माण करणारे कृत्य केल्यास
  • संघाच्या प्रतिष्ठेस अथवा इतर सदस्यांना बाधा पोहोचवणारे वर्तन केल्यास
  • संघाच्या नियम/अटींचे वारंवार उल्लंघन केल्यास

५. सभासद शुल्क

सभासद दर्जासाठी ठरवलेले शुल्क (सध्या ₹100) हे संघाच्या प्रशासकीय व सामाजिक कार्यासाठी वापरले जाते. एकदा भरलेले शुल्क साधारणपणे परत केले जात नाही (non-refundable), वैध कारण असल्यास कार्यकारिणी विवेकबुद्धीने निर्णय घेऊ शकते.

६. गोपनीयता व माहिती वापर

सदस्यांनी दिलेली माहिती संघाच्या निर्देशिका, संपर्क व अंतर्गत कामकाजासाठी वापरली जाईल. सार्वजनिक निर्देशिकेत कोणती माहिती (मोबाईल/WhatsApp/ईमेल) दाखवायची हे सर्वसाधारण सदस्यांसाठी त्यांच्या संमतीनुसार ठरते; पदाधिकारी व सभासद यांची मूलभूत संपर्क माहिती पारदर्शकतेसाठी सार्वजनिक निर्देशिकेत दाखवली जाते.

७. आचारसंहिता

सर्व सदस्य/सभासदांनी एकमेकांशी सौजन्याने वागावे. जात, धर्म, लिंग किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव, द्वेषपूर्ण वक्तव्य अथवा गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही.

८. वाद निवारण

संघाच्या कामकाजाबाबत किंवा सदस्यत्वाबाबत उद्भवणारे कोणतेही मतभेद प्रथम संघाच्या कार्यकारिणीसमोर मांडावेत. कार्यकारिणीचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.

९. बदल करण्याचा अधिकार

संघ या अटी व शर्तींमध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल करू शकतो. अद्ययावत अटी नेहमी याच पानावर उपलब्ध असतील.

या अटी मान्य नसल्यास कृपया संघाचे सदस्यत्व घेऊ नये. काही शंका असल्यास संपर्क पानावरून आमच्याशी संपर्क साधा.