संघाचे उद्देश
पुणे जिल्ह्यातून नवी मुंबईत स्थायिक झालेल्या — मूळ गावाकडून असो वा शहरी भागाकडून, ग्रामीण असो वा निमशहरी — प्रत्येक कुटुंबाला जोडणारे, एकमेकांना आधार देणारे व्यासपीठ उभारणे, हाच आमचा मूळ उद्देश आहे.
नोंदणी क्र. ठाणे/0000068/2024
एकत्रीकरण व आधार
पुणे जिल्ह्यातून नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी नवी मुंबईत आलेल्या कुटुंबांना एकत्रित करून एकमेकांना आधार देणे.
सामाजिक कार्यक्रम
संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम राबवणे.
शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना शैक्षणिक व करिअरविषयक मार्गदर्शन करणे, तसेच सदस्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणगौरव करणे.
आरोग्य सहकार्य
नवी मुंबईत राहणाऱ्या व संघाचे सदस्य असलेल्या पुणे जिल्ह्यातील कुटुंबांना आरोग्याच्या बाबतीत रुग्णालय संदर्भात आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करणे.
रक्तदान व आरोग्य सेवा उपक्रम
रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी आणि गरजू नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक मदत उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवणे.
पर्यावरण संवर्धन
पर्यावरण संवर्धनासह विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक कार्यक्रम राबवणे.
तुम्हीही या उद्देशासाठी योगदान देऊ शकता
सदस्य नोंदणी करताना तुम्ही कोणत्या प्रकारे योगदान देऊ इच्छिता ते नमूद करू शकता.
सदस्य नोंदणी करा